अनिल गोटे आणि शरद पवार भेटीने खळबळ

अनिल गोटे आणि शरद पवार भेटीने खळबळ

मुंबई ‌नगरी टीम

मुंबईःभाजपच्या वरिष्ठांसमोर बंडाचे निशाण फडकवणारे आमदार अनिल गोटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल सव्वीस वर्षांनी गोटे आणि पवार यांची भेट घेतली. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी आपण पवारांना भेटल्याचे गोटे यांनी सांगितले.अनिल गोटेंनी पवारांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच जहाल टीका केली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणात तर गोटे यांनी पवारांवर टीका करताना पातळी सोडली होती.तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यात संघर्ष वाढला होता.मात्र गोटे यांनी आज सांगितले की,राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. धुळे मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, मला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे. मला यासाठी ज्यांची मदत घ्यायची आहे,त्यांची मदत घेणार, असे गोटे यांनी पवारांच्या भेटींनतर सांगितले.

शरद पवार म्हणाले की,आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे आहे, आम्ही आघाडीधर्म मोडणार नाही.भाजपच्या वरिष्ठांशी पंगा घेतल्यामुळे गोटे कायम चर्चेत असतात. मात्र आता धुळे मतदारसंघात पवार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.

Previous articleपर्रीकरांची चिता पेटत असताना सत्तासुरांनी शपथविधी उरकून घेतला
Next articleराज ठाकरे आणि शरद पवार भेटीने तर्कवितर्कांना उधाण