नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध संग्राम जगताप सामना रंगणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : दक्षिण अहमदनगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना दक्षिण अहमदनगर मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या ठिकाणी सुजय विखे विरूद्ध संग्राम जगताप असा सामना रंगणार आहे.
दक्षिण अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने या मतदारसंघातून सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार हे नक्की झाल्याने सुजय यांना लढत देण्यासाठी राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना दक्षिण अहमदनगर मधून उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. त्यामुळे दक्षिण अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी खेळली आहे. अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज केली.