उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतुन काँग्रेसची उमेदवारी?

उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतुन काँग्रेसची उमेदवारी?

मुंबई नगरी टीम

मुंबईःबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरलाही राजकारणात जाण्याचे वेध लागले आहेत.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.काँग्रेसकडे तिने संपर्क साधला असून तिला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तिच्या स्टार व्हँल्यूचा उपयोग करून घेण्यासाठी काँग्रेस तिला तिकीट देऊ शकते.तिचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होईल.

येत्या दोन तीन दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २०१४ला काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.काँग्रेसकडे गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर हिच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे.गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी उमेदवारी मागितली होती.परंतु त्या दोघींपेक्षा उर्मिला निश्चितच किती तरी जास्त लोकप्रिय आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या “त्या” नगरसेवकांचे निलंबन अखेर मागे
Next articleपालघरमध्ये भाजप खासदार लढणार शिवसेना चिन्हावर ?