काँग्रेस नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर ?

काँग्रेस नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर ?

मुंबई नगरी टीम

पंढरपूर: भाजपने काँग्रेसमधील बड्या नेत्यांना आपल्याकडे आणल्यावर आता प्रभावी तरूण नेत्यांनाही ओढण्याचे काम सुरू केले आहे.काँग्रेस आघाडीला आणखी एक हादरा देत माढा विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेस तब्बल ६५ हजार मते घेणारे काँग्रेस नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजय शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली.याचा मनापासून राग भाजपला आला आहे.यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.कल्याणराव काळे हे पंढरपूरचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात कल्याणराव काळे यांनी तब्बल ६५ हजार मते  घेत त्यांना अडचणीत आणले होते.आता काळे भाजपमध्ये गेल्यास संजय शिंदेंसमोरच्या अडचणीतही मोठी वाढ होणार आहे.

 

 

Previous articleउत्तर मुंबईमध्ये गोपाल शेट्टी  विरूद्ध उर्मिला मातोंडकर असा सामना रंगणार
Next articleबीडचे पोलीस भाजपाचे गुलाम झाले आहेत : धनंजय मुंडे