मनसेचा काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा !

मनसेचा काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा !

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : मनसेने लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाचा निर्णय घेतला आहे. आज राजगडावर झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मनसेच्या या निर्णयाचा फटका शिवसेना भाजप ला बसण्याची शक्यता आहे.

आज राजगडावर मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. मनसे कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा असे नांदगावकर यांनी यावेळी सांगितले.

मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फटका मुंबई ठाणे आणि कल्याण मधिल युतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

Previous article१० मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात
Next articleप्रवीण गायकवाड यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी ?