प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी ?

प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी ?

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

टिळक भवन येथे संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण. जिजाऊ ब्रिग्रेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष सारिका भोसले, माजी पुणे जिल्हाध्यक्ष प्राचीताई दुधाने, अजयसिंह सावंत, विशाल तोळवे, प्रमोद गोतारणे, सुहास गायकवाड, प्रफुल्ल गुजर पाटील, अभिजीत जेधे, अमोल जाधवराव, राजेश देशमुख, किशोर मोदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पुणे लोकसभा मतदारसंघातून गायकवाड यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.

Previous articleमनसेचा काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा !
Next articleवडिलांचे नाव घेतले तर तुमच्या पोटात का दुखते ?