…तर  राजकारणातून संन्यास घेईल

…तर  राजकारणातून संन्यास घेईल

मुंबई नगरी टीम

पुणे :  मावळ येथे शेतक-यांवर झालेल्या गोळीबारासंदर्भात विरोधकांकडे माझ्या विरोधात कसलेही संभाषण  असल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.

वर्धा येथे काल झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळ गोळीबाराच्या संदर्भात राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. भाजपने केलेल्या या आरोपांचा समाचार अजित पवार यांनी घेतला ते म्हणाले की, पंतप्रधान  आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने माझ्या जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात माझे  कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर मी राजकारणातून सन्यास होईल. असे आरोप करणा-यांनी म त्यांचीही  राजकीय कारकीर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवून ‘ हा सूर्य हा जयद्रथ’ करावा असे आव्हान पवार यांनी विरोधकांना दिले.

Previous articleसरकारला लाज कशी वाटत नाही
Next articleसरकारचे चारा छावण्या ऐवजी डान्सबार लावण्यांना प्राधान्य