सरकारचे चारा छावण्या ऐवजी डान्सबार लावण्यांना प्राधान्य

सरकारचे चारा छावण्या ऐवजी डान्सबार लावण्यांना प्राधान्य

मुंबई नगरी टीम

नाशिक :  नाशिक जिल्ह्यातील चारा टंचाईमुळे शेतकरी वर्ग पुरता परेशान असल्याने  शेतकरी सरकारकडे जनावरांसाठी चारा छावण्याची मागणी करत आहे. मात्र हे कर्मदरिद्र सरकारचारा छावण्या ऐवजी डान्सबार आणि लावण्यांना प्राधान्य देत असल्याची टीका राज्याचे  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नाशिक लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरी, त्रंबकेश्वर, सिन्नर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. यावेळी सिन्नर येथे झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

शेतकरी चारही बाजूने संकटात सापडलेला आहे त्यामध्ये चाराटंचाईची भर पडली आहे. आज चारा टंचाई मुळे शेतकरी आपल्या धडधाकट जनावरांसह भाकड जनावरांना  कत्तलखान्याकडे नेतांना दिसत आहे. हे फडणवीस सरकारचे दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे  तसेच तरुण आणि सुशिक्षित तरुण रोजगाराअभावी वैफल्यग्रस्त होत  आहे. गॅसच्या  वाढत्या दरामुळे महिलावर्ग नाराज आहेत तर इंधन दरवाढीत संपूर्ण यंत्रणाच होरपळून निघत आहे. कष्टकरी आणि  कामगारांना खाजगीकरणाच्या माध्यमातून रोजगार काढून घेतला जात आहे अशा ऐनकेन मार्गाने हे सरकार देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला पुरते परेशान करत असुन  या  नाकर्तेपणाचे धोरण आवलंबवि-या सरकारला लगाम लावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

 

Previous article…तर  राजकारणातून संन्यास घेईल
Next articleपृथ्वीराज चव्हाणांनी पुढील पंतप्रधान कोण होणार हे घोषित करावे