दक्षिण मध्य मतदारसंघात हायटेक प्रचारासाठी काँग्रेस सज्ज
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी आता सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कंबर कसली आहे.दक्षिण मध्य मतदारसंघातील कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी तर प्रचारात समन्वय साधण्यासाठी वॅार रूमचा आधार घेतला आहे.या वॅार रूमच्या माध्यमातुन मुंबई कॅांग्रेसकडून करण्यात येणा-या बड्या नेत्यांच्या सभा आणि रोड शोजचे नियोजन करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूकांचा प्रचार आता चांगलाच वेग घेताना बघावयास मिळत आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत प्रभावी माध्यम ठरलेल्या समाज माध्यमांचा उपयोग याही निवडणूकीत मोठ्या प्रमाणात घेतला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण मध्य मुंबईतील कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आपल्या प्रचारासाठी थेट वॅार रूमचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.या माध्यमातुन बुख कार्यकर्ते, प्रचार प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवला जाणार आहे.या शिवाय पारंपारिक प्रचारासह फेसबुक, वॅाटसअप,ट्विटर या समाज माध्यामातून हायटेक प्रचाराचा आराखडा देखिल या वॅाररूमच्या माध्यामातून तयार करण्यात येत आहे.या मतदारसंघातून कॅांग्रेसने प्रचारात आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट दिसते.मतदारांशी थेट संवादावरभर देण्यात येत असून,चौकसभा आणि पदयात्रांवर भर दिला जात आहे.या पारंपारिक प्रचारासह विविध समाज माध्यमे प्रचाराचे प्रमुख अस्त्र बनले आहे. या माघ्यमांतूनही प्रचार करण्याचे नियोजन कॅांग्रेसने करीत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.या शिवाय कार्यकर्ते ,बुथ कार्यकर्ते यांच्याशी समन्वय रहावा यासाठी एक यंत्रणा उभारण्यात आली असून, या वॅाररूमच्या माध्यमातून त्याचे संचालन करण्यात येणार आहे. कमीत कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी.सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे.या निमित्ताने कॅांग्रेसने प्रचाराची सर्व यंत्रणा कामाला लावण्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर या माध्यामतून विरोधकांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार असल्याने दक्षिण मध्य मतदारसंघातून कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी कंबर कसली आहे.