सेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मनोज कोटकांनी दाखल केला अर्ज

सेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मनोज कोटकांनी दाखल केला अर्ज

मुंबई नगरी टीम

मुंबई : ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थित आज आपला उमेदवारी दाखल केला.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार मनोज कोटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्यात लढत होत असून, महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला. त्यापुर्वी त्यांनी सकाळी चैत्यभूमीवर जावून भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले . त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, किरीट सोमय्या, शिवसेना आमदार सुनिल राऊत, भाजप आमदार राम कदम, आदी नेते उपस्थित होते.

Previous articleएकनाथ  गायकवाड यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
Next articleमहायुतीचे उमेदवार  राजेंद्र गावीतांचा भेटीगाठीवर जोर