भाजपला पराभूत करू शकणाऱ्या सक्षम उमेदवारांना पाठिंबा द्या

भाजपला पराभूत करू शकणाऱ्या सक्षम उमेदवारांना पाठिंबा द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यास सक्षम असलेल्या उमेदवारांनाच भारतीय जनतेने भरघोस पाठिंबा द्यावा असं थेट आवाहन लोकांचे दोस्त तर्फे करण्यात आलं आहे.राज्यातील भाजपविरोधी मतदारांमध्ये वंचित बहुजन की काँग्रेस आघाडी असा पेच निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर दोस्तांनी निर्णायक भूमिका जाहीर केली आहे. दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीबा ज्योतिबा फुले जयंती संमेलनात दोस्तांच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.लोकांचे दोस्तचे केंद्रीय अध्यक्ष रवि भिलाणे यांनी दोस्तांची भूमिका जाहीर केली.

लोकांचे दोस्ततर्फे गेली वर्षभर,’भाजप विरुद्ध भारतीय’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शिवप्रतिज्ञा,तिरंगा उठाव,भाजप हटाव रॅली,ईव्हीएम विरुद्ध राष्ट्रीय उपवास,सरकार विरुद्ध सर्व समाज परिषद,भाजप सरकार समारोप संध्या अशा लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करत थेट मैदानात उतरून भाजप सरकारला आव्हान दिले गेले.मात्र आता ऐन निवडणुकीत राज्यातील भाजपविरोधी जनतेसमोर,वंचित बहुजन की काँग्रेस आघाडी असा पेच निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत वरील दोन आघाडयांपैकी ज्याचा उमेदवार भाजपला पराभूत करण्याइतका सक्षम असेल त्या उमेदवाराला जनतेने एकगठ्ठा पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 क्रांतीबा फुले जयंती संमेलनात संजीवनी नांगरे,सुनंदा नेवसे,दैवशाला गिरी,रंजना आठवले,मीना घाडगे,ज्ञानेश पाटील,काशीनाथ निकाळजे,बाळासाहेब उमप,भानुदास धुरी,सुरेंद्र अडांगळे,पत्रकार सुधाकर कश्यप आणि संजय खरताडे यांनी भाजपविरोधी रणनीतीवर भाष्य केले. संध्या पानस्कर आणि सहकाऱ्यांनी क्रांतिगीत सादर केले.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केलं.

Previous articleमुंलूंड गोरेगाव लिंक रोड प्रकल्प नियोजित वेळेत पुर्ण होणार
Next article…तसाच एक सध्या “चौकीदार” देशात आहे : शरद पवार