सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मुंबई नगरी टीम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यामुळे शेकडो जणांचे नाहक जीव गेले असून, त्याबद्द्ल या अविचारी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी भूमिका दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी सरकारचे फसलेले आर्थिक धोरण, पुनर्विकास आदी मुद्द्यावर त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. माग्याम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना गायकवाड यांनी प्रामुख्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीके झोड उठवली. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नोटबंदीमुळे छोट्या उद्योंगावर कु-हाड कोसळली असून, अनेकांचे रोजगार गेले आहेत. लघु उद्योगांना सावरण्याची गरज आहे. वस्तु व सेवा कराची पुनर्आखणी करण्याची गरज असल्याचे ही गायकवाड म्हणाले.धारावी पुनर्विकास एसआरएअंतर्गत न करता धारावीच्या पुनर्विकासासाठी न्यु सिटी डेव्हलपमेंट प्लान राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येकाला किमान ५०० चौ. फुटाचे घर मिळायला हवे या आश्वासनाचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला. गेल्या पाच वर्षात शिवसेना खासदार राहुल शेवाळे मतदारसंघात फिरकले नसल्याचा दावा त्यांनी केला.