मनोज कोटक यांनी साधला नागरिकांशी संवाद
मुंबई नगरी टीम
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मूायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. त्यांनी घाटकोपर पश्चिम येथील काजूटेकडी गणपती मंदीर, भानुशाली बाल मंदीर, दक्षिणमुखी हनुमान मदीर, सुधार सेवा सोसायटी,नारायण नगर आदी भागातील सर्वसामान्य नागरिक आणि विविध मंडळाना भेटी दिल्या.
काल रविवार सुट्टीचा दिवस साधत त्यांनी आणि पदाधिका-यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीवर भर दिला.येत्या शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने त्यांनी मचदारसंघातील सर्वच भागात जास्तीत जास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेत होते. मतदानाला आता केवळ सहा दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने एकत्र प्रचाराऐवजी महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध गटाद्वारे प्रचारावर भर दिला. काल रविवारी बाईक रॅली आणि पदयात्रासह मतदारांच्या घरी जावून वैयक्तिक भर देण्यात आला.काल सकाळपासूनच सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदान करण्याचे आवाहन केले. पारंपारिक प्राचारासह कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावर भर देत प्रचाराचे क्षणाक्षणांचे अपडेट,छायाचित्रे,फेसबुक, वॅाटसअप आणि ट्विटरच्या माध्यामातुन मतदारांशी संपक्र शाधण्यावर भर दिला. पंतनगर बेस्ट डेपो पासून बाल राजेश्र्वर मदिरापर्यंत निघालेल्या महाबाईक रॅलीत युवा वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता. विशेष करून महिला आणि महाविद्यालयीन तरूणींनीही बाईकवर स्वार होत महायुतीली मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत होते.