महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर
मुंबई नगरी टीम
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी पुढील पाच वर्षासाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे.आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या मन की बात जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षातील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे.त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे स्वागत मतदारांनी केले आहे.
ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी , गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्रप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या आगळ्या वेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.
संकल्पपत्रातील काही महत्वाचे मुद्दे
रेल्वे, मेट्रो, आणि रस्ते वाहतुक सुधारणा
मेट्रो ४ – वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
मेट्रो २ बी – मानखुर्द – बांद्रा – बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
मेट्रो ६ विक्रोळी – जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
मुलुंड – गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर – अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार