उत्तर मुंबईत उर्मिला मातोंडकर की गोपाल शेट्टी ?
मुंबई नगरी टीम
मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात अभिनेत्री आणि कॅाग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची लढत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर असून, एक्झिट पोल नुसार या ठिकाणी भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी बाजी मारण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी यावेळी त्यांचे मताधिक्य कमी होण्याचा अंदाज बांधला जात आहे.
सुरूवातीला एकतर्फी वाढणारी उत्तर मुंबईतील लढत नंतर चांगलीत चुरशीची ठरली उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो. या ठिकाणाहून कोणालाही उमेदवारी दिल्यास विजय नक्की मानला जातो.या ठिकाणी उर्मिला मांतोडकर यांना मनसेने पाठिंबा दिल्याने खरा निकाल काय लागतो हे येत्या २३ मे रोजी स्पष्ट होईल. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ही जागा भाजप राखण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१४ निवडणूक निकाल
१ ) गोपाल शेट्टी भाजप – ६६४००४
२ ) संजय निरूपम कॅांग्रेस – २१७४२२