विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला  २२६ जागांवर आघाडी  मिळण्याची शक्यता !

विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला  २२६ जागांवर आघाडी  मिळण्याची शक्यता !

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभेत  निवडणुकीत राज्यात भाजपाने ४८ पैकी २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात अनेक मतदार संघात बहुमत मिळाले असल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला २२६ जागांवर आघाडी मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने ऐतिहासिक विजय संपादन करत  एनडीएने ३५२ जागांवर, तर एकट्या भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. तीन महिन्यानंतर  राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपर्यंत जनतेचा कल कायम राहिल्यास  विधानसभा निवडणुकीत  महायुती बाजी मारण्याची शक्यता आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकून या मतदार संघात महायुतीने बाजी मारली आहे. या सहा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदार संघातही युतीची चलती  आहे. ३६ पैकी तब्बल ३१ मतदार संघात महायुतीला बहुमत मिळाले असून केवळ ५ मतदार संघात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ५ तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीला यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.लोकसभा निकालानुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीत  २८८ जागांपैकी महायुतीला २२६ ,काँग्रेस-राष्ट्रवादीला ५६ आणि अपक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.मुंबईतील ३६,जागांपैकी,भाजप-शिवसेना ३१काँग्रेस-राष्ट्रवादी ३, समाजवादी पार्टी १ एमआयएमला  १ जागा मिळू शकते. कोकणातील एकूण ३६ जागांपैकी भाजप-शिवसेनाला २७ काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी ८, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला १ जागा मिळू शकते.मराठवाडयातील एकूण ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना – ३७ काँग्रेस-राष्ट्रवादी -६ वंचित बहुजन आघाडी-एमआयएम – २ तर  अपक्षांना १ जागा मिळू शकते.विदर्भ ६० जागांपैकी भाजप-शिवसेना ४९ काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला ११ जागा मिळू शकतात.उत्तर महाराष्ट्रातील ३६ जागांपैकी भाजप-शिवसेना ३१ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ५ जागा मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात ७२ जागांपैकी भाजप-शिवसेना ४९ तर  काँग्रेस-राष्ट्रवादीला २३ जागा मिळू शकतात.

Previous articleविखे-पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे किती आमदार जाणार ? 
Next articleशिवसेनेला चार मंत्रीपदासह उपसभापतीपद मिळणार ?