शासकीय कर्मचाऱ्यांनो आता जेवण उरका अर्ध्या तासात
मुंबई नगरी टीम
मुंबई : कामचुकार शासकीय कर्मचा-यांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे.दुपारच्या जेवणाचा कालावधी दुपारी १ ते २ असला तरी आता जेवण अर्ध्या तासात उरकावे असे परिपत्रत सरकारने जारी केले आहे.याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
२१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरीक शासकीय कार्यालयात आपली गा-हाणी घेवून आले असता अधिकारी, कर्मचारी यावेळेत उपलब्ध होत नाहीत. जेवणाची वेळ असल्याचे अभ्यागतांना सांगण्यात येते अशा तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच एकाच शाखेतील अधिकारी कर्मचारी एकाच वेळी भोजणासाठी जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.