विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची “विकास यात्रा”

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची “विकास यात्रा”

मुंबई नगरी टीम

मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकीची भाजपच्यावतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून येत्या ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिर एक बार शिवशाही सरकार  ही विकास यात्रा काढणार आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री संपूर्ण राज्यात फिरून युती सरकारची कामे जनतेसमोर मांडणार आहेत. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी विकास रथयात्रा काढल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात पाहिल्यांदा रथयात्रेचा प्रयोग होत असल्याचे महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज भाजपच्या पदाधिका-यांनी बैठकी  दादर येथिल वंसत स्मृती येथे पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. ऑगस्ट महिन्यात होणा-या मुख्यमंत्र्यांच्या विकास यात्रेत गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप- शिवसेना सरकारने केलेल्या कामाचा प्रसार करण्याच येणार आहे. प्रत्येक मतदार संघात जाणारी मुख्यमंत्र्यांची ही स्वतंत्र यात्रा असली तरी  विविध भागातले नेते आणि मंत्री पदाधिकारी त्या त्या ठिकाणी या यात्रेत सहभागी होणार आहेत.आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी संख्या वाढवण्याबरोबर २८८ मतदारसंघात बूथ रचना मजबूत करताना प्रत्येक ठिकाणी पाच बूथचे युनिट तयार करण्यात येणार असून, त्यानुसार  २० हजार बुथ युनिट प्रमुखांचा समन्वय साधण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. विधानसभेत युतीला  २२२ जागा कशा जिंकता येतील यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले

Previous articleआमचे युतीबाबत ठरल्याने इतरांनी तोंड घालू नये
Next articleमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  ५६ हजार रुग्णांना मदत