राधाकृष्ण विखे पाटील ठरले क्रमांक तीनचे मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील ठरले क्रमांक तीनचे मंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश केलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील क्रमांक दोनचे मंत्री ठरले आहेत. राजशिष्ठाचार विभागाने मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जारी केलेल्या यादीत मंत्र्यांचे ज्येष्ठता क्रमांक निश्चित आहेत.

राजशिष्ठाचार विभागाने मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जारी केलेल्या यादीत मुख्यमंत्र्यांनंतर क्रमांक दोनचे मंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आहेत. तर माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजपात प्रवेश केलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्या खोलोखाल परिवहनमंत्री दिवाकर रावते ( ४ ) वित्त मंत्री सुधार मुनगंटीवार हे ज्येष्ठता यादीत पाचव्या क्रमांकाचे मंत्री ठरले आहेत. रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर सहाव्या क्रमांकावर आहेत. ज्येष्ठता यादीनुसार मंत्र्यांचे क्रम पुढील प्रमाणे – पर्यावरण मंत्री रामदास कदम ( ७ ),उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे ( ८ ),ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ( ९ ), सार्वजनिक बांधकाममंत्री ( उपक्रम ) एकनाथ शिंदे ( १० ),उद्योगमंत्री सुभाष देसाई ( ११ ) , जलसंपदामंत्री गिरीष महाजन ( १२ ), पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर ( १३ ) , उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( १४ ), पणन व वस्त्रोद्योगमंत्री राम शिंदे( १५ ), सहकार मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख ( १६ ), अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल ( १७ ), अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील निलंगेकर( १८ ),पदुम मंत्री महादेव जानकर ( १९ ), सामाजिक न्यायमंत्री डॅा.सुरेश खाडे ( २० ), कामगार मंत्री डॅा. संजय कुटे ( २१ ), कृषीमंत्री  डॉ. अनिल बोंडे ( २२ ), शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार ( २३ ), आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके ( २४ ), जलसंधारणमंत्री  तानाजी सावंत ( २५ ).

 

Previous articleमालाड दुर्घटनाग्रस्त बेघरांचे त्वरित पुनर्वसन करा
Next articleअटलजी केवळ भाजपाचेच नेते नव्हते तर ते देशाचे नेते