शरद पवार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट देणार

शरद पवार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट देणार

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी ८ जुलै रोजी भेट देणार आहेत.येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

तिवरे धरण फुटल्याने यामध्ये २३ जणांचा बळी गेला आहे. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी व शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

दरम्यान या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ७ जुलै ते ८ जुलैपर्यंत पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्हयाच्या दौर्‍यावर असून पुणे येथील साखर कारखान्याच्या सेमीनारला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Previous articleआ. प्रविण दरेकर यांच्या ‘संपर्क अभियाना’चा आजपासून शुभारंभ
Next articleशेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करा