बीड जिल्ह्यातील सर्व जागा भाजपच जिंकणार

बीड जिल्ह्यातील सर्व जागा भाजपच जिंकणार

मुंबई नगरी टीम

परळी : देशात व राज्यात भाजप सरकारने सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अनेक योजना आखल्या. तळागाळातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्कर्षासाठी या योजना प्रभावीपणे राबवून शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे. आगामी काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी व जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा,  राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे आणि सर्वच्या सर्व आपले आमदार विजयी होणार आहेत असा विश्वास बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला .

भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत सुरु असलेल्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्ह्यातील परळी , पांगरी कॅम्प ,वडवणी,बीड,गेवराई येथे भाजपच्या नवीन सदस्य नोंदणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवार ६ जूलै रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, माजी आमदार केशवराव आंधळे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठिक ठिकाणी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या,  सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची दिसणारी कामे आम्ही केली. राष्ट्रीय महामार्ग ,रेल्वे, ग्रामीण रस्ते ,पाणीपुरवठा योजना, अशा अनेक विकास कामांमुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघाला असून सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावले आहे.बीड जिल्ह्यातील जनतेला अभिप्रेत असलेले जिल्ह्याच्या विकासाचे वैभवशाली स्वप्न सत्तेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. बीड जिल्ह्याची जनता हि नेहमीच विकासाला प्राधान्य देऊन चांगल्या माणसांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा असे आवाहन करत राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे आणि सर्वच्या सर्व आपले आमदार विजयी होणार आहेत असा विश्वास  मुंडे यांनी व्यक्त केला.

 

 

Previous articleविवाहावरील खर्च टाळत मुख्यमंत्री मदत निधीला पाच लाखांची रक्कम
Next articleविधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या