धक्कादायक…मंत्रालयाच्या कँटनीमध्ये पदवीधर झाले वाढपी
मुंबई नगरी टीम
मुंबई : बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आले आहे. राज्याचे मुख्यालय असणा-या मंत्रालय कँटीनमध्ये वाढपी या पदासाठी चक्क लेखी परिक्षा घेण्यात आली असून,वाढपी पदाच्या एकूण १३ जागांसाठी तब्बल ३ हजार ६०० इच्छुकांनी आपले नशिब अजमावले. हजारोच्या संख्येतून केवळ १३ जणांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. तर या परिक्षेची गुणवत्ता १०० पैकी ९६ वर जावून पोहचली आहे. वाढपी पगासाठी ४ थी पास पात्रता असताना या पदासाठी बहुतांश उमेदवार हे पदवीधर होते. त्यामुळे या पदाचे मेरीट ९६ वर गेल्याचे सांगण्यात आले.
देशात आणि राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पदासाठी चक्क पदवीधर मोठ्या प्रमाणात अर्ज करित असल्याचे वास्तव यापूर्वी पुढे आले आहे. कोणती भरती असल्यास पदवीधर अशा पदांसाठी अर्ज करित असल्याने चतुर्थ श्रेणी पदासाठी पात्र असणारे डावलले जात आहेत. राज्यात मंत्रालय, विधानभवन, कोकण भवन, मंत्रालयासमोरील प्रशासकीय भवन या ठिकाणी एकूण सात सरकारी कँटीन असून, त्यामध्ये एकूण सध्या २७५ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्याच वर्षी या कँटीन मधिल रिक्त असणा-या १३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.या १३ जागांसाठी राज्यातील विविध भागातील सुमारे ७ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ हजार ६०० उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली.या साठी १०० गुणांची परिक्षा घेण्यात येवून,यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता ही ९६ ठेवावी लागल्याने ९६ ते ९० गुण मिळवणा-या १३ उमेदवारांची वाढपी पदासाठी निवड करण्यात आली असून, यामध्ये बहुतांश उमेदवार हे पदवीधर आहेत.
मंत्रालय, विधानभवन, कोकण भवन आणि प्रशासकीय भवनातील सरकारी कँटीन मधिल वाढप्यांना कालांतराने सहाय्यक मॅनेजर पदावर बढती मिळते वाढपी हे पद ड वर्गातील असून ते सरळसेवे भरले जाते कँटीनमधील वाढपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मासिक २५ ते ३० हजाराच्या दरम्यान पगार मिळतो. त्यामुळे पदवीधरांचे मोठ्या संख्येने अर्ज आल्याचे सांगण्यात आले.
गुणवत्ता तक्ता (१०० पैकी) पुढील प्रमाणे :व्हीजे ए – ९६ गुण. एसटी -९४ गुण. खुला -९२ गुण. एनटी डी -९२. एनटी सी -९४. महिला उमेवार ८८ गुण. अपंग उमेदवार ५० गुण.