राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायदा करा

राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायदा करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने जसा कायदा केला तसा कायदा महाराष्ट्र सरकारने करून स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देणे कायद्याच्या सक्तीने बंधनकारक करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी संगितले.

आंध्रप्रदेश सरकारने नोक-यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. असा कायदा करणारे आंध्रप्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्यानुसार राज्यातील स्थानिकांना उद्योगांमध्ये ७५ टक्के आरक्षण मिळणार आहे. आता महाराष्ट्रात आंध्रप्रदेशाप्रमाणे स्थानिकांना रोजगारामध्ये ८० आरक्षण देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. असा कायदा राज्यात झाल्यास स्थानिक बेरोजगारांना त्यांच्या जिल्ह्यात असलेल्या खाजगी कंपन्या आणि खाजगी कारखान्यात काम देणे हे खाजगी मालकांना बंधनकारक राहील. असाच कायदा राज्यात करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे  सामंत यांनी संगितले.

खाजगी उद्योगाप्रमाणेच शासकीय नोकऱ्यांमध्ये देखील स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा करावा अशीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सामंत यांनी संगितले.ह्या संदर्भात शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी विशेष पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांना करणार असल्याचेही सामंत यांनी संगितले.

Previous articleआता एसटीचे आरक्षण करा ६० दिवस अगोदर
Next articleमुंबईत राष्ट्रवादीला  धक्का ; सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार