खूशखबर : १ हजार ५६० शिक्षकीय पदे भरणार

खूशखबर : १ हजार ५६० शिक्षकीय पदे भरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांमधील मंजूर पदांपैकी शिक्षकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १५६० शिक्षकीय पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिक्षकीय रिक्त पदे भरण्यासंदर्भातला प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. उपसमितीच्या शिफारशीनुसार १ हजार ५६० पदे भरण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी रिक्त पदे भरण्याचा प्रश्नाचा पाठपुरावा वित्तमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागाकडे केला होता.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांमधील ६५९ पदे, शासकीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९७ पदे, नक्षलग्रस्त ५ महिला महाविद्यालयांमधील २९ पदे, शासकीय अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये ३९८ पदे, अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये १९२ पदे, अशासकीय अनुदानित वास्तुशास्त्रसाठी २५ पदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामधील ६० पदांना मान्यता दिली आहे.

Previous articleसेल्फी काढत “पुर पर्यटन” करणा-या मंत्र्यांना लाज कशी वाटत नाही
Next articleतातडीने उपाययोजना करा आणि लोकांचे जीव वाचवा