कोल्हापूर -सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी भाजपा सरसावले
मुंबई नगरी टीम
मुंबई : कोल्हापूर -सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यासाठी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क साधून तिथे कोणत्या वस्तूंची कमरता आहे याची माहिती घेऊन, त्यानुषंगाने मदत पाठविण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला आहे. मदतीचा एक टेम्पो रविवारी पाठविला असून उद्या मंगळवारी ते मदत फेरी काढून जीवनाश्यक वस्तूंची मदत गोळा करून पाठविणार आहेत.
कोल्हापूर -सांगली येथील महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले. या पुरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून घेतली. त्यानुसार आमदार प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांसाठी चादर, चटई, ब्लॅंकेट, अंतर्वस्त्र, सॅनिटरी नॅपकिन इत्यादी वस्तू टेम्पो भरून सांगलीला रवाना करण्यात आला. ही मदत घेण्यासाठी सचिन पाटील व अनंत पवार हे प्रतिनिधी सांगलीहून आले होते. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत शिवाजी चौगुले, निषाद कोरा, हेमचंद्र नार्वेकर, अमित उतेकर, सम्राट कदम उपस्थित होते.
दरम्यान, उद्या मंगळवारी मागाठाणे परिसरात मदत फेरी काढून कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत जमा करणार आहोत. पुराने सर्वस्व हरवून गेलेल्या कोल्हापूर जिल्यातील नागरिकांना शक्य तितकी मदत पाठविण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पाठविला जाईल, असेही आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.