चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची पूरग्रस्त सहाय्यता समिती
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची पूरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीच्या संयोजकपदी माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी मंत्री पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, सुरेश खाडे, आशिष शेलार व रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अन्य सदस्य पुढीलप्रमाणे – खा. गिरीष बापट, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर, प्रदेश सचिव अतुल भोसले व मकरंद देशपांडे, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, भाजपा सांगली शहराध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख, सांगलीच्या महापौर संगीता खोत, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आ. भीमराव तापकीर, राज्य सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सांगलीचे नगरसेवक शेखर इनामदार, मदनदादा भोसले, हिंदुराव शेळके, राहुल चिकोडे, संतोष जनाठे व डी. के. मोहिते.