भीक काय मागताय… द्यायचं असेल तर मानाने द्या

भीक काय मागताय… द्यायचं असेल तर मानाने द्या

मुंबई नगरी टीम

यवतमाळ : विनोद तावडे भीक काय मागताय… हे काय चाललंय… जनतेची चेष्टा करताय… द्यायचं असेल तर मानाने… सन्मानाने द्या… तुमची भीक नकोय…अशा शब्दात पुरग्रस्तांसाठी मदत फेरीच्या माध्यामातून मदत मागणा-या सरकारच्या मंत्र्यांवर अजित पवार यांनी जोरदार टीका केली.

राज्यात आणि देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गुन्हेगारीत वाढ झाली आहे. हे रोखण्यात सरकारला अपयश आले आहे असे सांगतानाच मुख्यमंत्र्याच्या नागपुरमधील गुन्हेगारीबाबत बोलताना अजित पवार यांनी निशाणा साधला. उडता पंजाब सिनेमात अंमली पदार्थाचे सेवन करणा-या तरुणाईची संख्या दाखवण्यात आली होती तशीच परिस्थिती महाराष्ट्रात वाढते आहे. महाराष्ट्राची अवस्था उडता पंजाब सारखी करण्यात आली आहे असा आरोप करतानाच कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवालही पवार यांनी केला. सोयाबीन व कापूस पिकांना पीक विमा अनुदान मिळालेले नाही.त्यामुळे तुम्ही मतदारराजा आहात त्यामुळे बदल केला पाहिजे. जातपात धर्म बघू नका आम्ही सर्व धर्मांना घेवून पुढे जात आहोत याला साथ द्या असे आवाहनही पवार यांनी केले.

Previous articleकाँग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
Next articleआंबेनळी बस दुर्घटनेतील वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती