मुख्यमंत्र्यांना जनतेचा कळवळा नाही

मुख्यमंत्र्यांना जनतेचा कळवळा नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ११ माणसांचा मृत्यु झाला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जावून बसले आहेत. त्यांना जनतेबद्दल कळवळा नसल्याची टिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पुणे व परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भिषण परिस्थिती निर्माण झाली असताना तेथील नागरिकांना मतद करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना निवडणूकांची काळजी आहे, म्हणूनच ते अशा बिकट प्रसंगी ही अपतग्रस्त जनतेला मतद करण्याऐवजी निवडणूकीच्या कामाऐवजी दिल्लीला जावून बसले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्राच्या पुर परिस्थितीत ही हेच केले होते. त्यांना जनतेचा कळवळा नाही, असे ट्विट करून धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रशासनाने पुण्यात अधिक लक्ष द्यावे तसेच नागरीकांनी सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous articleराजू शेट्टींना धक्का ; रविकांत तुपकरांचा राजीनामा
Next articleगोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी