युतीचा फॉर्म्यूला जाहीर ; शिवसेना १२४ तर भाजप १४६
मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.तर दुसरीकडे शिवसेनेने आपल्या वाट्याला आलेल्या १२४ मतदार संघ जाहीर केले आहेत. त्यानुसार भाजप १४६, शिवसेना १२४ तर मित्र पक्षांना १८ जागा सोडल्याचे आजच्या यादीवरून स्पष्ट झाले आहे.
युती मध्ये १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आली आहे.भाजप आपल्या कोट्यातून शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन जागा देणार आहे.कालच महायुतीची घोषणा करण्यात आली मात्र जागा वाटपाचा तपशील जाहीर करण्यात आला नव्हता.आज शिवेसना-भाजपाचा युतीचा फॉर्म्यूलाही जाहीर झाला आहे. भाजपकडून आज अधिकृतपणे १२५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी ते कोणत्या जागांवर लढणार आहेत हे जाहीर केले आहे. नव्या फॉर्म्युलानुसार, शिवसेना १२४ जागांवर लढणार आहे. तर दुसरीकडे भाजपा १४६ आणि मित्रपक्ष १८ जागांवर लढणार असल्याचे नक्की झाले आहे.
नवी दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे.