मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघात २४४ उमेदवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघातील ३२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघात एकूण २४४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. तर ४ ऑक्टोबर २०१९ ही नामनिर्देश पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत एकूण ३३४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. या नामनिर्देश पत्रांची छाननी दि. ५ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आली. या छाननीदरम्यान ५९ उमेदवारांची  नामनिर्देशपत्रे अवैध, तर २७६ उमेदवारांची नामनिर्देश पत्रे वैध ठरली.

नामनिर्देश पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसापर्यंत २६ विधानसभा मतदार संघांतून ३२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. ज्यामुळे आता मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधान सभा मतदार संघात एकूण २४४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या २६ विधानसभा मतदारसंघांपैकी १६८ – चांदिवली व १७२ – अणुशक्तीनगर या दोन्ही मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी १५ उमेदवार आहेत. तर १५२ – बोरिवली व १७७- वांद्रे पश्चिम या दोन मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी ४ उमेदवार आहेत.

 मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे

बोरीवली विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार -४,दहिसर विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ८,मागाठाणे विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ९,मुलुंड विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १३,विक्रोळी विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ९,भांडूप (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ७,जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ७,दिंडोशी विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १०, कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ६,चारकोप विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ७, मालाड (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार – ११, गोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ९,वर्सोवा विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ९,अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ८, अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ८, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ६,चांदिवली विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १५,घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १३,घाटकोपर (पूर्व) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार-११,मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १०,अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार-१५,चेंबुर विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार-१२, कुर्ला विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार-६,कलिना विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १४, वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- १३ वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवार- ४

Previous articleमुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात एकुण ८९ उमेदवार
Next articleविजयाची खात्री नसल्यानेच आघाडीकडून आश्वासनांची खैरात