भाजपाच्या चार बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

भाजपाच्या चार बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या चार पदाधिका-यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणा-या भाजपच्या चार जणांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.भाईंदर मध्ये भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात गीता जैन यांनी बंडखोरी करीत मोठे आव्हान उभे केले आहे.तर तुमसर मध्ये प्रदिप पडोळे यांच्या विरोधात विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवड मधून पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी करणारे बाळासाहेब ओव्हाळ आणि अहमदपूर, लातूर मधून बंडखोरी करणारे  दिलीप देशमुख यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

Previous articleराणेंचं ठरलं… १५ ऑक्टोबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार
Next articleकाँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पदयात्रा व चौक सभांवर भर