शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम ; भाजपाला खिंडीत गाठण्याच्या हालचाली
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपा शिवसेनेला बरोबर घेतल्या शिवाय सरकार स्थापन करू शकत नसल्याने आता शिवसेनेने आपल्या समसमान वाटपावर ठाम राहत मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे.तसेच सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे अशी मागणी केल्याने भाजपा पुढे पेच निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत.पुढील रणनिती ठरविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित केली होती. तासाभर चाललेल्या या बैठकीत बहुतांश आमदारांनी सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी केली असल्याचे समजते.निकालानंतर कॅांग्रेसचे प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असतनाचा राज्यात आता सत्ता स्थापनेला आता वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका काय असावी यासाठी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणी आमदारांनी केल्याचे समजते.सत्तेचे समसमान वाटप करण्यात यावे, अशीही मागणी आमदारांनी यावेळी केली. नेता निवड आणि सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत आमदारांनी घेतला.
लोकसभा निवडणुकीवेळी युती करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेनेने ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा करण्यात आली होती. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे असून, आमच्यासाठी उपमुख्यमंत्रीपद हे दुय्यम आहे असे सांगतानाच सत्तास्थापनेचे सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिवसेनेच्या एका आमदाराने दिली.आजच्या एकूणच घडामोडींवरून शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्याल्या सुरूवात केली असल्याची चर्चा आहे.