शिवसेना भाजपात मुख्यंमंत्रीपदावरून ठिणगी

शिवसेना भाजपात मुख्यंमंत्रीपदावरून ठिणगी

मुंबई नगरी टीम

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून शिवसेना भाजपात ठिणगी पडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज भाजपा आणि शिवसेनेत होणारी बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. सत्तेत समसमान फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वृत्त वाहिणीशी  बोलताना सांगितले की,भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आज सायंकाळी महत्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्री जर समसमान फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे म्हणत असताली तर आम्ही या बैठकीत कशावर चर्चा करायची आणे कशासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचे याच कारणास्तव आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. ईज वर्षावर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना नक्की काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जर समसमान फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सत्याची व्याख्याच बदलायला हवी. मुख्यमंत्री स्वतः समसमान फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याबाबत वारंवार सांगितले आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे जर अशी चर्चाच झाली नसल्याचे त्यांचे मत असेल तर त्यांच्या विधानाला मी प्रणाम करतो असेही राऊत म्हणाले.

Previous articleअडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कसलाच निर्णय झाला नव्हता
Next articleअगोदर संजय काकडेंनी एका पक्षात स्थिर राहावे