महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही : गडकरी
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू असतानाच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तिन्हा पक्षांची झालेली आघाडी हि सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार आले तरी जास्त काळ टिकणार नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.हे सर्व पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत.शिवसेना आणि भाजपाची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली होती परंतु सध्या अस्तित्वात येत असलेली आघाडी संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीकाही गडकरी यांनी केली आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. या तिन्ही पक्षांमध्ये कसलाही ताळमेळ नसून, शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने पहिल्यापासुनच विरोध राहिला आहे.तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेचा विरोध आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतेही शिवसेनेच्या विरोधात असल्याने या तिन्ही पक्षांची झालेली महाविकास आघाडी हि विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारावर झालेली नाही.असे सांगून हि आघाडी केवळ संधी साधू आघाडी असल्याची टीका गडकरी यांनी केली आहे.शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आले तरी हि आघाडी जास्त काळ टिकणार नाही आणि राज्यात स्थिर सरकार देवू शकणार नाही. त्यामुळे हि आघाडी राज्यातील जनतेसाठी चांगली नसल्याचेही गडकरी म्हणाले.शिवसेना आणि भाजपाची युती ही एका सिद्धांताच्या आणि वितारांवर आधारीत होती. या युती मागे हिंदुत्वाचा विचार होता. त्यामुळे अनेक वर्षे याकडे युती म्हणून पाहिले जात होते.मात्र या दोन पक्षांमधिल तुटलेली युती हे मराठी माणसाचे नुकसान असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.