राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्याच्या राजकारणाला मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आज सकाळी  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांचा शपथविधी आज राजभवनात पार पडला.या नव्या अनपेक्षित समिकरणामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असतानाच एका रात्रीत राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आज काल रात्रीत संपूर्ण राजकारण पालटून गेले.काल तिन्ही पक्षांच्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कुठेच दिसले नाही.अखेर भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मला पुन्हा एकदा राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नाकारात शिवसेनेने दुस-या पक्षाशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही लवकरच विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Previous articleउद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Next articleभाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार