गॅस पेटवणं सोपं, परंतु चूल पेटली पाहिजे !

गॅस पेटवणं सोपं, परंतु चूल पेटली पाहिजे !
मुंबई नगरी टीम
औरंगबाद : राज्यातील गोरगरीब जनेतेच्या दैनंदीन समस्या अनेक आहेत.गॅस पेटवणं एका राजकारण्यासाठी सोपं आहे परंतु चूलही पेटली पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गॅस जोडणी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.राज्यातील शेतकरी एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत आहे.शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही कर्जमुक्तीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्तही करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगबादमध्ये ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झाले आहे. आमचे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचे आहे.गॅस पेटवणे एका राजकारण्यासाठी सोपं आहे परंतु चूलही पेटली पाहिजे,अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गॅस जोडणी प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. उद्योजकांना प्रेरणा देणारे हे सरकार आहे. कृषी आणि उद्योगाची सांगड घालून राज्यात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही. महाराष्ट्राला रडण्याची नव्हे, तर लढण्याची परंपरा आहे’, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Previous articleउच्च व तंत्रशिक्षण विभागातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द
Next articleमुलीच्या बनावट पासपोर्टमुळे एजाज लकडावाला पोलीसांच्या जाळ्यात