“पत” नसेल तर पद काय कामाचे : प्रविण दरेकर

“पत” नसेल तर पद काय कामाचे : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : पदाबरोबर “पत” नसेल तर पद काय कामाचे, त्या पदाचा काय उपयोग असे सांगतानाच पक्षाचे नेतृत्व हे सर्व समावेशक भाजपच्या नेतृत्वासारखे असावे अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडली. भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व कार्यक्रमातंर्गत मागाठाणे विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या घोषणेच्या कार्यक्रमाचे उदघाटन विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते झाले. भाजपच्या मागाठाणे विधानसभा मंडल अध्यक्षपदी दिलिप उपाध्याय यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्या विरोधकाने पण अमित शहा राष्ट्रभक्त असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहनती आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व प्रतिभा संपन्न आहे, त्यामुळे या खंबीर व बळकट नेतृत्वाचा आदर्श घेऊन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करायला हवे अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केले.

पक्ष संघटनाची बुथ स्तरापर्यंत १०० टक्के रचना पूर्ण झाली, तरच तो पदाधिकारी यशस्वी अशी भूमिका दरेकर यांनी मांडतानाच समाजातील सर्व घटकांना भाजपाचा हा पदाधिकारी हा आपला तारणहार आहे, अशी भावना निर्माण व्हायला हवी तसे काम करा, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांकडे लक्ष असेलच परंतु मागाठाणे मधील समस्या सो़डविण्याकरिता आपले नेहमीच प्राधान्य राहिल. असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.महापालिका व म्हाडाशी प्रलंबित प्रश्न सुध्दा आपण मार्गी लागू, विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून विकासकामे सोडविण्याकडे आपण लक्ष देऊ व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संघटन मजबूत करा आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम तुम्ही करावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे “कन्फ्युज” सरकार आहे. “कन्फ्युज” सरकार यांच्यामध्ये संवाद नसून विसंवादाच जास्त आहे. सरकारी निर्णयांना स्थगित देण्यातच त्यांना जास्त रस आहे. त्यामुळे राज्याच्या कोटयवधी जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.समाजातील सर्व घटकांकडे मतांच्या नजरेतून बघण्यात येते, पण टॅक्स भरणारा करदाता हा आपल्या मेहनतीच्या पैशातून कर भरतो त्यांच्या प्रश्नाकडे मात्र योग्य पध्दतीने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी व हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्यादृष्टीने लक्ष देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.पक्षाचे निष्ठेने काम केल्यावर न्याय मिळतोच त्याचे उदाहरण मी आहे. संघटनेने मला वरळीत राहत असताना बोरीवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची संधी दिली असे सांगतानाच बोरीवलीचे आमदार सुनिल राणे यांनी सांगितले की, पक्षाची ही संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि काम याचे फलित आहे, त्यामुळे निरपेक्ष भावनेने कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, सर्वांना यश नक्कीच मिळेल असेही दरेकर म्हणाले.

Previous articleयोगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घ्या : देवेंद्र फडणवीस
Next articleकोकण विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने पाठवा : उदय सामंत