उद्या मंत्रिमंडळ विस्तार; या नेत्यांना मिळणार संधी
मुंबई नगर टीम
मुंबई :शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सोमवारी होणार आहे. दुपारी १ वाजता विधानभवनाच्या प्रांगणात होणा-या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत,त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो.राष्ट्रवादीचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत.त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात.काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी दिली जाणार आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या सोमवारी होणार आहे.विधानभवनाच्या प्रांगणात दुपारी 1 वाजता होणा-या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील.त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे १३ मंत्री शपथ घेतील १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.तर काँग्रेसकडून १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामध्ये आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.काँग्रेसकडून कोणाला संधी द्यायची यासंदर्भात आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.त्यानुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे.तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.या मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रहार संघटनेचे बच्चू कडू,समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून कोणाला संधी द्यावयाची यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर संबंधित नेत्यांना स्वत: शरद पवार यांनी दुरध्वनी करून कल्पना दिली. त्यानुसार अजित पवार, दिलीप वळसे पाटील,नवाब मलिक,जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ,बाळासाहेब पाटील,दत्ता भरणे,अनिल देशमुख,डॉ. राजेंद्र शिंगणे,अदिती तटकरे,डॉ. किरण लहामटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होवू शकतो.काँग्रेसमधून अशोक चव्हाण, अमित देशमुख,के.सी.पाडवी,सतेज पाटील,विश्वजित कदम,संग्राम थोपटे,विजय वड्डेटीवार,यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदे यांना तर शिवसेनेकडून रविंद्र वायकर किंवा सुनील प्रभू, प्रताप सरनाईक,उदय सामंत,भास्कर जाधव किंवा वैभव नाईक,शंभुराजे देसाई,प्रकाश अबिटकर,अब्दुल सत्तार,तानाजी सावंत,आशिष जैस्वाल,संजय राठोड,गुलाबराव पाटील,दादा भुसे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.