वाचा कोणती खाती कोणाला; महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे

वाचा कोणती खाती कोणाला; महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे

मुंबई नगरी टीम

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार होवून पाच दिवसांचा कालावधी उलटूनही मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर न झाल्याने मंत्र्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला होता तर यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप यादीला हिरवा कंदील दाखवला आहे.या यादीला मंजूरी देत त्यांनी मंत्र्यांच्या खात्याची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे.खातेवाटपाची अधिकृत घोषणा उद्या रविवारी होणार आहे.

सहा दिवसांच्या नाराजीनाट्यानंतर आज अखेर खातेवाटप अंतिम करण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादीला मंजुरी देत ही यादी राज्यपालांकडे पाठविली आहे.खातेवाटपात महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.खातेपाटपात अपेक्षेप्रमाणे गृह,अर्थ, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क कामगार अशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेली आहेत.महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले असून, अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्याचे समजते.तर नितीन राऊत यांना ऊर्जा खाते देण्यात आल्याचे समजते.

शिवसेना मंत्र्यांची खाती

एकनाथ शिंदे – नगरविकास
सुभाष देसाई – उद्योग
उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे – पर्यटन, पर्यावरण
अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज
शंकरराव गडाख – जलसंधारण
संदिपान भुमरे – रोजगार हमी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
दादा भुसे – कृषि
संजय राठोड – वने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी

अजित पवार – वित्त

अनिलदेशमुख – गृहमंत्री

जयंत पाटील- जलसंपदा

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील- राज्य उत्पादन शुल्क, कामगार
बाळासाहेब पाटील – सहकार
राजेश टोपे- आरोग्य
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ – ग्रामविकास

काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी

बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वड्डेटीवार – ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार – दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे

राज्यमंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री (ग्रामीण)

अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास

बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार

सतेज पाटील – गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार

राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन

अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा

दत्ता भरणे – जलसंधारण, सामान्य प्रशासन

संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम

प्राजक्त तनपुरे – नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

Previous articleज्यांना जनतेने नाकारले त्यांच्यासोबत घरोबा करण्याचे पातक शिवसेनेने केले
Next articleअखेर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर