भगवा झेंडा मनसेचा मात्र जुंपली राष्ट्रवादी आणि भाजपात

मुंबई नगरी टीम

मुंबई : मनसेच्या नव्या भगव्या झेंड्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपात जुंपली आहे.मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरणामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे डोके असल्याचा दावा भाजपाच्यावतीने करण्यात आला आहे तर भाजप शरद पवारांना किती घाबरतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली मात्र आता यावरून पवार यांच्यावर आरोप करणे योग्य नाही असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन गुरूवारी मुंबईत पार पडले.या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले मात्र या नव्या झेंड्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपात जुपल्याचे चित्र बघायला मिळाले.मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरणामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे डोके असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.तर भाजप शरद पवार यांना किती घाबरतो याचे एक उत्तम उदाहरण आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली मात्र आता पवार यांच्यावर आरोप करणे योग्य नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.हिंदुत्वाची मते फुटू नये एवढेच काम भाजप करतो की,देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो असा टोलाही पाटील यांनी लगावला.धार्मिकदृष्टया भाजप किती विचार करतो हे हिंदूनाही आता कळून आले आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हिंदूंच्या मतांच्या विभाजनासाठी शरद पवार यांनी चाणाक्षपणे मनसेचा वापर केला आहे.त्यांनी राज ठाकरेंचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला, असा आरोप हाके यांनी केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली,म्हणून मनसे भगवी होत आहे.हिंदूधर्म किंवा महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली राज ठाकरे यांना शक्ती देण्याचे काम पवार करत आहेत असा आरोप हाके यांनी केला.मनसेच्या बदललेल्या झेंडयातून येणारा जो विचार आहे तो विचार महाराष्ट्र कितपत स्वीकारेल यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी मनसेच्या आजच्या अधिवेशन व भगव्या झेंडयावर प्रतिक्रिया दिली आहे.मनसेने इंजिन चिन्हावर बरीच वर्षे काम केले आहे. त्यामुळे आता अचानक झेंडा बदलला आहे.मनसेचा नवीन अवतार आहे,नवीन झेंडा आहे, भाषा आणि विचार बदलले आहेत त्यामुळे ते रुजण्यासाठी तेवढाच काळ लागेल असेही पाटील म्हणाले.

Previous articleकृउबा समिती निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच कार्यकारी सहकारी संस्थांमधून सदस्य निवडणार
Next articleरयतच्या समुह विद्यापीठाचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणणार