सरकारने शेतक-यांच्या नाईटलाईफची चिंता करावी : फडणवीस

मुंबई नगरी टीम
परभणी : पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील नाईटलाईफवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.मुंबईतील नाईटलाईफ ठीक आहे.पण,शेतक-यांच्या नाईटलाईफची चिंता सुद्धा सरकारला करावी लागेल.शेतक-यांना सुद्धा दिवसा वीज मिळाली पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय भव्य कृषी संजीवनी महोत्सवाचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफवर निशाणा साधला.मुंबईतील नाईटलाईफ ठीक आहे.पण,शेतक-यांच्या नाईटलाईफची चिंता सुद्धा सरकारला करावी लागेल शेतक-यांना सुद्धा दिवसा वीज मिळाली पाहिजे,तो त्यांचा हक्क आहे. मराठवाडा वॉटरग्रीड हा मराठवाड्याच्या पाणीसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्यात बदल करायचे असतील तर करावे, पण त्या प्रकल्पाला थांबविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये.पैशाची कुठली कमतरता नाही,सरकारने ते कारण सांगू नये असेही ते म्हणाले.

कर्जमाफीसारखे उपाय हे तत्कालिक आहेत, ते शाश्वत असू शकत नाहीत. शेतीला शाश्वत करायचे असेल तर जलयुक्त शिवार,मागेल त्याला शेततळे यासारख्या योजना अतिशय लाभदायी आहेत.त्या पुढे न्यायला हव्या.लातूरमध्ये शेततळी पाहून आपण या योजनेला व्यापक स्वरूप दिले.शेतीला नवीन तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे, तोवर ती शाश्वत होऊ शकत नाही.मराठवाड्यातील समस्या तर फारच भीन्न आहेत. त्या क्वचितच अन्य कुठल्या शेतक-यांच्या वाट्याला आल्या असतील असे त्यांनी सांगितले.मराठवाड्याच्या पुढच्या पिढीने दुष्काळ पाहू नये, हे स्वप्न आम्ही पाहिले होते. तशी कृतीही आरंभ केली होती. सा-यांच बाबी अंतिम टप्प्यात होत्या.नव्या सरकारला काही अडचणी असतील, तर त्यांनी त्या नक्की सांगाव्या. आम्ही पूर्ण मदत करायला तयार आहोत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Previous articleठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय ; १०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार
Next articleशेतकऱ्यांना खुशखबर : कर्जमुक्तीचा लाभ १५ एप्रिलपुर्वी मिळणार