मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होत असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तर शिवसेना आणि कॅांग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने आज देशातील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.कॅांग्रेसचे हुसेन दलवाई,अमर साबळे ( भाजप) रामदास आठवले,संजय काकडे ( भाजप पुरस्कृत),शरद पवार आणि माजीद मेनन ( राष्ट्रवादी),राजकुमार धूत ( शिवसेना) या ७ राज्यसभा सदस्यांची मुदत २ मार्च रोजी संपत आहे.या ७ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणुक होत आहे.त्यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तर भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.शिवसेना, राष्ट्रवादी,भाजप आणि कॅांग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता असली तरी उमेदवारीसाठी आत्तापासूनच लॅाबिंगला सुरूवात झाली आहे. येत्या ६ मार्चला राज्यसभेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १३ मार्च ही अंतिम मुदत असून, १६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. १८ मार्च ही तारिख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २६ मार्चला सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान पार पडेल. त्याच दिवशी ५ वाजता मतमोजमी करण्यात येईल. सध्याचे संख्याबळ पाहता ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.