मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी आज राज्यातील भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष,भाजपाचे महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जेथे भाजपा आमदार नाहीत,अशा विधानसभांतील प्रभारींशी संवाद साधला.या संवादातून अनेक जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणांचे लोक अडकले आहेत, हा एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला.देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांची आहे तेथेच सेवा करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपातर्फे हाती घेण्यात आलेले सेवाकार्य आता तालुका पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे.अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषधी, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.वर्धा जिल्ह्यात शेतक-यांचा शेतमाल नाफेड खरेदी करायला तयार आहे. पण, त्या खरेदीवर बंदी टाकण्यात आली आहे, याकडेही स्थानिक पदाधिका-यांनी लक्ष वेधले. हा विषय सरकारच्या कानावर घालण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.