मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात दररोज कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, आज कोरोना बाधित ८१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईत चिंता वाढविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.आज मुंबईत एका दिवसात ५७ नविन रूग्ण आढळले आहेत.राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४१६ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे एकूण १९ मृत्यू झाले आहेत.
राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात एकूण ८१ नविन रूग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४१६ वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक रूग्ण संख्या मुंबई मध्ये वाढताना दिसत आहे. आज मुंबईत आज ५७ नविन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.आज पुण्यात ६, पिंपरी चिंचवड मध्ये ३,अहमदनगर मध्ये ९, ठाण्यात ५ तर बुलढाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यात करोना मुळे एकूण १९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याला दिलासा देणारी घटना घडली आहे. कोरोना बाधित एकूण ४२ जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.