मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या एकूण ५ उमेदवारांनी तर अन्य ५ जाणांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ९ जागांसाठी आता १४ उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचे राजेश राठोड या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.गोपीचंद पडळकर,प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि डॉ. अजित गोपचडे या चार भाजपाच्या उमेदवारांनी दोन दिवसापूर्वी अर्ज दाखल केले आहेत.तर खबरदारी म्हणून भाजपचे संदीप लेले ,रमेश कराड राष्ट्रवादीचे किरण पावसकर , शिवाजीराव गर्जे यांनी तर राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष) या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्यामुळे आता ९ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मागे घेण्याच्या म्हणजेच १४ मे रोजी हे ५ उमेदवार आपले अर्ज मागे घेतील त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.