या कारणामुळे अजित पवारांनी भाजपशी हात मिळवला आणि उपमुख्यमंत्री झाले !

मुंबई नगरी टीम

मुंबई : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी सत्ता स्थापनेची बोलणी सुरू असतानाच अचानक पहाटे पहाटे भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.त्यावेळी  अजित पवार यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला होता याची माहिती आता पुढे आली आहे.ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वॉन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकातून याचा उलघडा केला आहे.

२०१९ च्या झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरचा राजकीय संघर्ष संपूर्ण जगाने पाहिला आहे.दररोज घडणा-या राजकीय घडामोडींमुळे तर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्यानंतर महाराष्ट्रात घडलेला सत्तासंघर्ष राज्यातील जनतेच्या मनात कायम राहणारा असाच आहे.या निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६,राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.त्यामुळे  सत्तेसाठी  सर्वच पक्षांना एकमेकांची मदत घेतल्या शिवाय सत्ता स्थापन करणे गरजेचे होते.विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती असतानाही दोन्ही पक्षांना जनमताचा कौल मिळाला असतानाही निकालानंतर या दोन्ही पक्षात वितुष्ठ निर्माण होवून सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे दुश्मन झाले होते.शिवसेना खासदार संजय राऊत एकीकडे सत्तेसाठी जुळवाजुळव करत असतानाच राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करीत अचानक पहाटे राजभवनात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता.

हे पुस्तक या लिंकवर उपलब्ध आहे-Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra https://www.amazon.in/dp/B088P3596L/ref=cm_sw_r_wa_api_i_qkkWEb7VRA01E

शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अजित पवारांऐवजी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पद देण्याचा निर्णय झाला होता. याची कुणकुण अजित पवारांना लागली होती.त्यानंतर ख-या अर्थाने राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली आणि अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवण्याचा निर्णय घेतला.त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू  धनंजय मुंडे यांना याबाबतचा संपूर्ण प्लॅन सांगितला. धनंजय मुंडे यांनी यासाठी नकार देत अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांनी मुंडे यांचे ऐकले नाही.या घडामोडीनंतर मुंडे यांनी अजित पवारांच्या ३८ समर्थक आमदारांना रात्री १२.३० वाजता आपल्या बंगल्यावर बोलावून घेतले. शरद पवारांना की अजित पवारांना साथ द्यायचा हा प्रश्न मुंडे यांच्यापुढे पडला होता. या संपूर्ण टेंशनमध्ये आपल्या बंगल्यावर न राहता मुंडे यांनी कफ परेड येथील आपल्या मित्राच्या बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला पण भविष्यात होणा-या घडामोडीमुळे त्यांना रात्रभर झोप लागली नाही.असेही राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

Previous articleराज्यात आतापर्यंत कोरोनाच्या १० हजार ३१८ रुग्णांना डिस्चार्ज
Next articleम्हणून…धैर्यशील माने ठरले देशातील पहिले खासदार!