• Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Search
Logo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Sunday, June 22, 2025
Sign in / Join
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Home ब्रेकिंग न्यूज खुशखबर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात ६ दिवसात शिष्यवृत्ती जमा होणार
  • ब्रेकिंग न्यूज

खुशखबर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात ६ दिवसात शिष्यवृत्ती जमा होणार

By
Editor
-
May 21, 2020

मुंबई नगरी टीम

मुंबई  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित  पवार यांच्याकडून मान्यता मिळवली असून, लाभार्थी असलेल्या जवळपास १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांना ६ दिवसाच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपापल्या खात्यावर मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीपूर्वी मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या शिष्यवृत्ती संदर्भात मागणी केली असता  पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता देत, वित्त विभागामार्फत शिष्यवृत्तीचा ४६२.६९ कोटी रुपये निधी समाज कल्याण आयुक्तालयास वर्ग केला आहे.राज्यातील अनुसूचित जातीच्या १ लाख ६९ हजार १७१ विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच २७ हजार ८४५ विद्यार्थ्यांची फ्रीशिप शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग याद्वारे मोकळा झाला आहे.

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी १ लाख ६९ हजार १७१ विद्यार्थ्यांची एकूण ३४७ कोटी ६९ लाख रुपये शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या २७ हजार ८४५ विद्यार्थ्यांची ११४ कोटी रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वित्त विभागाने तातडीने आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र, यांच्या खात्यावर वर्ग केली असून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांच्या आत प्रत्यक्ष वाटप केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री  मुंडे यांनी दिली.लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने मुंडे यांनी पवारांकडे पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे.कोरोना विषाणू मुळे उदभवलेल्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तातडीने ही शिष्यवृत्ती देऊ केली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपची रक्कम विभागाला प्राप्त झाली असून, येत्या ६ दिवसात ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येईल, एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, असे यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.

  • TAGS
  • ajit pawar
  • credited to the account
  • dhananjay munde
  • Scheduled Caste students
  • Scholarship
WhatsApp
Facebook
Twitter
Linkedin
ReddIt
Email
Telegram
    Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतक-यांना केले हे आवाहन
    Next articleराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४१ हजार ६४२ वर पोहचली
    Editor

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन !

    महायुती सरकारचा शपथविधी केव्हा होणार ? अजितदादांनी तारीखच सांगितली

    निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार १५०० रूपये

    “नॉटरिचेबल” असलेले अजित पवार नक्की नाराज आहेत की आजारी ? समोर आली खरी माहिती

    तुमच्या हातात घड्याळ की तुतारी ? निलेश लंके म्हणाले…साहेब सांगतील तो आदेश !

    धनंजय मुंडेंमुळे बीडमधून भरघोस मतांनी विजयी होणार

    ताज्या बातम्या

    विधानभवनात मना सारखं केबिन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याने टाकलाय कार्यालयावर बहिष्कार...

    July 28, 2023

    संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; राऊतांच्या वक्तव्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेत...

    March 1, 2023

    ५० खोके एकदम ओके… ! विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

    December 19, 2022

    ठराव मंजूर : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर; तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’

    August 25, 2022

    शहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी

    July 3, 2022

    खास तुमच्यासाठी

    मंत्रिमंडळाचा निर्णय : यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई नगरी - February 5, 2024 0

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

    मुंबई नगरी - December 13, 2022 0

    दिव्यांगांसाठी खूशखबर : राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

    मुंबई नगरी - November 29, 2022 0

    मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी

    मुंबई नगरी - November 17, 2022 0

    आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय

    मुंबई नगरी - September 21, 2022 0

    लोकप्रिय बातम्या

    निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार...

    June 28, 2024

    दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही

    May 24, 2024

    राज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

    May 14, 2024

    सामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण...

    August 11, 2023

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार

    August 9, 2023

    © Mumbai Nagri Designed by
    Tushar Bhambare +91 9579794143

    • About
    • Contact Us
    • Sitemap
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    कॉपी करू नका.