मुंबई नगरी टीम
मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करुत.हे आणि यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन)चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला.यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत,गुंतवणूकदार.उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते.विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड ७६० कोटी, हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-२, पुणे २५० कोटी आणि १५० रोजगार,असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे ५६० कोटी,वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर ८२० कोटी,हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव १५० कोटी आणि २५०० रोजगार ,असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे ११०० कोटी आणि २०० रोजगार,इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे १२० कोटी आणि ११०० रोजगार,पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव १००० कोटी रोजगार १५००,इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड १५०० कोटी आणि रोजगार २५००,रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे १५०० कोटी,युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड ५००० कोटी आणि रोजगार ३०००,ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे ३७७० कोटी आणि २०४२, या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुकेश आघी व वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली.इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.दरम्यान, या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.