सरकार पाडून दाखवा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सरकार पाडून दाखवा, असे जाहीर आव्हान दिले आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला तीन चाकी सरकार म्हणतात मग केंद्रातील  सरकार किती चाकी आहे ? असा सवालही त्यांनी केला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून,ही मुलाखत उद्या शनिवारी  आणि रविवार प्रसारीत होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाजलेल्या मुलाखतीनंतर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीचा तिसरा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.महाविकास आघाडी सरकार ऑक्टोबरपर्यंत पडणार,अशी चर्चा सुरु आहे.त्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यापूर्वी केला होता.त्यावर प्रश्न केला असता,माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा असे आव्हान मुख्यमंत्री  ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे. राज्यात  तीन चाकी सरकार असल्याची टीका केली जाते, मग केंद्रात किती चाकी  सरकार आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत केला आहे.

आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का ? असा सवाल करीत त्यांनी राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले आहे.साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री झालो असलो तरी याच साठी केला होता अट्टहास असे नाही, तर हा योगायोग आहे. असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले आहे. राऊत यांनी घेतलेल्या या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता असून,  ही मुलाखत उद्या शनिवारी आणि रविवार प्रसारीत केली जाणार आहे.

Previous articleशिक्षण क्षेत्रात “या” कारणास्तव महाराष्ट्र ठरले एकमेव राज्य
Next articleनिवडणूक आयोगाकडून भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? : चव्हाणांचा गंभीर आरोप