‘रसोडे में कौन था’चा भाजप व्हर्जन ऐकलात का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘रसोडे में कौन था?’ अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.मालिकेतील एक भाग या व्हिडीओत दाखवण्यात आला असून गाण्याच्या माध्यमातून त्याचे रिक्रिएशन करण्यात आले आहे.पंरतु या व्हिडीओचा वापर आता राजकीय टोलेबाजीसाठी देखील केला जात आहे. काँग्रेसने या व्हिडीओचे एक नवे व्हर्जन तयार केले असून त्यात भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ‘रसोडे में कौन था’चा भाजप व्हर्जन आपल्यासमोर ठेवला आहे.

“कल जनता की आँखो में धूल झोकी थी और वो दुबारा सोने गयी थी, तुम विकास का सपना दिखाकर जनता के पास आये थे तब, #रसोडे में कौन था? वहाँ कौन था? काँग्रेस थी?, भाजपा थी?, काँग्रेस थी?, भाजपा थी? कौन था? कौन था? कौन था??? मोदी जी थे…  मोदी जी, ७० साल का विकास निकाल दिये और भारत का जीडीपी डुबा दिया. जीडीपी डुबा दिया, हाँ डुबा दिया, मोदी जी!”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे. त्यांचे हे ट्वीट नेटक-यांनाही पसंत पडले असून त्याला अनेकांनी मनोरंजक पद्धतीने दाद दिली आहे.

नेहमीच राजकीय मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसची टोलेबाजी पाहायला मिळते. पण यावेळी वायरल ट्रेंडचा वापर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधण्यासाठी केला. तर भाजपने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपवर तोफ डागली आहे. सुशांतचा मित्र संदिप सिंह आणि भाजपमधील संबंधांचा मुद्दा सचिन सावंत यांनी उपस्थित केला असून दोन्ही पक्षांकडून यावर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.

Previous articleमंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर एमआयएम, शिवसेना आमने-सामने 
Next articleवाचा : राज्य सरकारने जारी केलेली “मिशन बिगीन अगेन-४” ची नियमावली